CLICK HERE
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमात मागील वर्षी शिक्षकांनी दाखवून दिले आहे की ते आत्मविश्वासाने परिपूर्ण आहेत. मागील वर्षी 1,80,000 शिक्षकांनी प्रशिक्षणाची मागणी केली तर 68,000 शिक्षकांनी स्वखर्चाने कुमठे, मिरज, ताडाळी, निफाड, लातूर, गडहिंग्लज, गगनबावडा, सव, हवेली सारख्या बीट, केंद्र व गटांना भेट दिली. मागील वर्षी सबंध राज्यात बऱ्याचश्या जिल्हा परिषद शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाची मुले दाखल होत असल्याचेही आढळले. या शाळांचा अभ्यास केला असता या शाळा मराठी माध्यमात चांगल्या गुणवत्तेच्या शिक्षणासोबत इंग्रजी विषय सुद्धा गुणवत्तापूर्ण पद्धतीने शिकवत आहेत. इंग्रजी माध्यमातून मुलांना काढून मराठी माध्यमात घालणाऱ्या तसेच जि.प. शाळांच्या गुणवत्तेवर खुश असणाऱ्या पालकांशी बोलल्यावर कळले की मुलांना spoken English जमले तर त्यांच्या मते त्या शाळेत इंग्रजीचे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे. राज्यात पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे दिसतो. पण सखोल अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आले की आपल्या मुलांना चांगले इंग्रजी बोलता यायला हवे एवढेच पालकांना वाटते.शासनाचे मत पालकांपेक्षा वेगळे नाही म्हणूनच सन 2000 पासून राज्यात पहिल्या वर्गापासून इंग्रजी अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र त्यास अपेक्षित परिणाम मिळालेला नाही. आजपर्यंत लोकांना वाटते की मराठी माध्यमातून शिकलेल्या शिक्षकांना इंग्रजी शिकवणे जमणार नाही. बऱ्याच शिक्षकांना अजूनही तसेच वाटत असण्याची शक्यता आहे. राज्य आंग्लभाषा संस्था म्हणून आम्ही पण काही विशेष केले असे म्हणणार नाही. परंतु बरेच मराठी माध्यमातूनच शिकलेले शिक्षक याबाबतीत यश मिळवत आहेत. अशा यशस्वी झालेल्या शिक्षकांची मदत घेऊन SIEM सुद्धा राज्यात spoken English बाबतीत सार्वत्रिकीकरण करण्यात यशस्वी होऊ पाहात आहे. हा कार्यक्रम राज्यात सर्वदूर एकाच वेळी सुरू करण्याची सूचना येत आहे. परंतु संस्था हे कार्य शिक्षकांवर कोणताही ताण न येवू देता करू इच्छिते. म्हणून असे शिक्षक जे शैक्षणिक वर्ष 2016-17 च्या शेवटपर्यंत आपल्या वर्गातील मुलांना spoken English शिकवण्याबाबत आत्मविश्वास बाळगून आहेत ,त्यांनी खालील माहिती भरून नोंदणी करावी . या कार्यक्रमाचे हे पहिलेच वर्ष असल्यामुळे किमान 5000 शिक्षक नाव नोंदवतील अशी आशा आहे. मात्र प्रगत शैक्षणिक कार्यक्रम अशा सांख्यिकीय उद्दिष्टांवर विश्वास ठेवत नसून मानवी प्रयत्नांच्या पराकाष्ठेवर विश्वास ठेवते याची आपणास जाणीव आहेच. त्यामुळे ही संख्या 5000 च्या खाली आल्यास त्याचे दु:ख होणार नाही. मात्र ती 5000 च्या पुढे गेल्यास सर्वांना आनंद होईल. नियोजनासाठी पूरेसा वेळ आम्हाला मिळावा म्हणून नाव नोंदवण्यास त्वरा करा. तथापि नोंदणी ची शेवटची तारीख 31 मे, 2016 ठेवण्यात येत आहे.
महत्वाचे - यापूर्वी SPOKEN ENGLISH संदर्भात यशस्वी झालेल्या आणि इतर शिक्षकांच्या मदतीस तयार असलेल्या शिक्षकांनीही या लिंक अंतर्गत नोंदणी करावी . हा फाॅर्म इंग्रजी CAPITAL LETTERS मध्ये भरावा.



























